आपली ’अमृतातेही पैजा जिंके’ मराठी भाषा, अतिशय समृद्ध तर आहेच आणि वळवावी तशी वळतेही. पण गंमत अशी आहे की आपल्या या मातृभाषेतल्या काही वाक्यप्रचारांचा अर्थच आपल्याला माहित नसतो. म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत काही वाक्यप्रचार/ शब्दसमूहांच्या उद्गम कथा..
अंगात किडे आहेत - किंवा **त किडे आहेत - अमुक तमुक च्या **त खाजच जास्त!! असे शब्द कायम कानावर पडत असतात किंवा आपणही हा वाक्यप्रयोग करत वारंवार करत असतो. पण हा शब्द प्रयोग नक्की आपल्या भाषेत आला कसा हा विचार कधी केला आहे का ?
नाही ना ? बरं असू दया...
किडे प्रयोगाचा शास्त्रीय उगम आहे मातीत! होय मातीत !
लहान मुलं मातीत खेळतात.त्यांच्या नखात माती साठते. हात स्वच्छ धुतले नाहीत तर ही माती पोटात जाते आणि मुलांच्या पोटात थ्रेड वर्म किंवा मराठीत सांगायचं तर कृमी होतात. थोड्याच दिवसात हे जंत मोठ्या आतड्यात बस्तान ठोकतात. काही दिवसात अंडी देण्याची वेळ आली की आतड्यातून गुदद्वारातून बाहेर पडण्याची धडपड करतात. ही वेळ असते सन्ध्याकाळची किंवा रात्रीच्या पहिल्या प्रहराची. जंतांच्या या वळवळीने लहान मुलं अस्वस्थ होतात , त्यांचं लक्ष कशातही लागत नाहीत आणि पार्श्वभागात असह्य खाज सुटते.
असेच सारखे काहीतरी निरर्थक आणि दुसऱ्याला त्रास देणारे उद्योग मोठी माणसं करतात तेव्हा आपण म्हणतो की...'अमुक तमुकच्या अंगात किडे ज़रा जास्तच आहेत'. लोकहो, भाषेची घडण होते ती अशी
आता.
पुढच्या भागात आपण बघू " कपाळात गेल्या " हा शब्द प्रयोग कसा आला ते !
