रेल्वे दुर्घटना सारख्या घटना अनेकदा होत असतात. अश्यावेळी रुग्णांना तातडीने हॉस्पिटल मध्ये दाखल करणं गरजेचं असतं. दुर्घटनेनंतरच्या पहिल्या तासाला ‘गोल्डन अवर’ म्हणतात. या दरम्यान दिले गेलेले उपचार त्याचं भविष्य ठरवत असतात.
मंडळी खुशखबर अशी आहे की अश्या आपत्कालीन स्थितीत तातडीने मदत मिळावी म्हणून रेल्वे विभागातर्फे ‘आपत्कालीन वैद्यकीय कक्ष’ (ई. एम. आर.) ची स्थापना करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशावरून ही सेवा दिली जात आहे.
सध्या या प्रकारची सेवा अनेक रेल्वे स्टेशन्स वर सुरु आहे. याची खासियत म्हणजे तुम्हला या ठिकाणी केवळ १ रुपयात उपचार करून मिळेल. पण आपत्कालीन स्थितीत ही सेवा मोफत मिळणार आहे. आत्ता पर्यंत जवळजवळ १०,००० लोकांना याचा फायदा झाला आहे.
काही दिवसांपूर्वी एका ४१ वर्षीय माणसाचा जीव ई. एम. आर. मुळे वाचला. या माणसाला हृदयविकाराचा झटका येणार होता. पण वेळीस त्याला उपचार मिळाल्यामुळे त्याचे प्राण वाचले. अश्यावेळी तातडीने कराव्या लागणाऱ्या उपचाराबरोबर या कक्षात पाथोलॉजी लॅब सुद्धा आहे जिथे परीक्षण केलं जातं.
मुंबई सारख्या शहरात जिथे अनेकदा असे अपघात होतात, याची सर्वात जास्त गरज आहे. असं म्हणतात की पुढील काही वर्षात ही सेवा मुंबईच्या प्रत्येक रेल्वे स्टेशन वर मिळेल.
रेल्वे विभाग तर्फे हे खूप मोठं पाउल उचललं गेलं आहे. याच यश अपयश हे भविष्याच ठरवेल.

