युद्ध, रोगराई किंवा नैसर्गिक आपत्ती संकट कोणतंही असलं तरी त्याचा पहिला बळी असतो लहान मुलं. युद्धात मारले गेलेल्याच्या संख्येत जश्या स्त्रिया असतात तसेच त्याच संख्येने मुलंही असतात. मंडळी आज याची आठवण काढण्याचं कारण म्हणजे रोहिंग्या मुस्लिमांच्या निर्वासित कॅम्प मधील एका लहानग्याचा झालेला मृत्यू !!

वरील फोटोत दिसणारा मुलगा हा बांगलादेश मधील रोहिंग्या मुसलमानांच्या निर्वासित कॅम्प मधला आहे. ‘अब्दुल अझीज’ असं या मुलाचं नाव. तो ११ वर्षांचा होता. आश्चर्य म्हणजे ताप आणि खोकला सारख्या साध्या आजाराने त्याचा मृत्यू झाला. तो दहा दिवसापासून आजाराने ग्रस्त होता पण वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने त्याला जीव गमवावा लागला आहे. अश्यावेळी प्रश्न पडतो की मोठ्यांच्या भांडणात या मुलाचा काय दोष होता ?
मंडळी, अश्या संकटात बळी पडलेल्या मुलाचं हे ताजं उदाहरण आहे पण याआधी सुद्धा अनेकदा अश्या घटना घडल्या आहेत. याचीच काही उदाहरणं आपण पाहूयात !!
