"कधीही न बुडणारं जहाज" असा नावलौकिक घेऊन हे जगातलं सर्वात मोठं जहाज इंग्लंड मधून न्यूयॉर्कच्या दिशेनं निघालं आणि अवघ्या चार दिवसांत या टायटॅनिकला जलसमाधी मिळाली. जवळपास १,५१७ प्रवाशांचा मृत्यू या अपघातात झाला. हे सगळं तुम्ही टायटॅनिक या चित्रपटात पाहीलं असेलच. पण या जहाजाबद्दल थोडी जास्त उत्सुकता असणार्यांसाठी हे जहाज परत येत आहे...
चीनमधली जिनलिंग शिपयार्ड ही जहाज निर्माती कंपनी टायटॅनिकची प्रतिकृती निर्माण करतेय. यासाठी क्लाईव्ह पाल्मर या अॉस्ट्रेलीयन अब्जाधीशानं गुंतवणूक केली आहे. ही टायटॅनिकची जशीच्या तशी प्रतिकृती बनवण्यासाठी १.६५ करोड डॉलर्स इतका खर्च आलाय आणि लवकरच ही प्रतिकृती पूर्णत्वास येईल.

