'आपदा मे अवसर' हे वाक्य अनेकवेळा म्हटले जाते. याचा साधा सरळ अर्थ म्हणजे काही चूक झाल्यास त्याचा वापर चांगल्यासाठीच करून घेणे. जुगाडाचाच हा वेगळा पॅटर्न म्हणता येईल. आपण टाकाऊतून टिकाऊ करतो ना, काहीसं तसंच. या सर्वांवर कडी करत परू(Peru) देशातील एका बियर कंपनीने ज्या एका चुकीमुळे त्यांची बाजारात प्रचंड नाचक्की झाली असती, त्यातून त्यांनी चक्क कोट्यवधींचा व्यवसाय केला आहे.
हेनीकेन बीअर कंपनी तर माहितच असेल. ही कंपनी ट्रेस कृसेज या ब्रँडची बियर तयार करत होती. हा ब्रँड ते बाजारात आणत होते. ३ लाख बियर कॅन त्यांनी बनवून रिटेल दुकानदारांना पाठवून दिले. एवढे सगळे झाले आणि त्यांना एक मोठी चूक आपण केली हे समजले. या सर्व बियर कॅन्सवर स्पेलिंग मिस्टेक होती.


