मुंबईत दोनच ऋतू. एक पावसाळा आणि दुसरा उन्हाळा!! एकदा पावसाच्य्य धारा, तर एकदा घामाच्या. त्यात आला आहे ऑक्टोबर महिना आणि सोबत ऑक्टोबर हीट. रेल्वेने धावपळ करत प्रवास करणार्या मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे.
ऑक्टोबर महिना आला. चला ऑक्टोबर आला तर आला, पण आज पर्यंत ऑक्टोबर कधी एकटा आलाय? ऑक्टोबर स्वतःबरोबर घेऊन येतो ती ऑक्टोबर हीट. या हीटमध्ये उन्हाळ्यासारख्याच झळा मुंबईकरांना, त्यातही त्यात रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना जरा जास्तच लागतात. पण काही प्रमाणात का होईना गरमीने त्रस्त होणाऱ्या मुंबईचा त्रास आता कमी होणार आहे .
CST स्टेशनवर लवकरच मुबईकरांच्या सेवेत ५ मोठे पंखे ज्यांना आपण अगदी जायंट फॅन्स म्हणू, असे दाखल होतायत. सेंट्रल रेल्वेने हे पंखे बसवण्यासाठी नुकत्याच काही चाचण्या घेतल्या. त्या चाचण्यांच्या आधारे हे ५ ही पंखे CST स्टेशन परिसरात लावण्याचा निर्णय घेतलाय. ५ मधले ४ पंखे उपनगरांसाठी सुटणाऱ्या ट्रेन्स म्हणजे लोकल्स जवळच्या प्लॅटफॉर्मसवर लावण्यात येतील. तर १ पंखा हा उपनगर आणि मेन लाईन म्हणजेच लांबपल्याच्या गाड्या जिथून सुटतात, त्यांच्यामध्ये लावण्यात येणार आहे.

Micriair नावाच्या US-BASED कंपनीने तयार केलेल्या ह्या पंख्यांचा व्यासच १६ फुटांचा आहे आणि ह्याची किंमत विचाराल तर?? हे पाचही पंखे डोक्यावर जरी लावले ना तरी प्रत्येक मुंबईकराला घाम नक्की फुटेल . या एका पंख्याची किंमत आहे ३.२५ लाख रुपये!!
सेंट्रल रेल्वेचा असे अजून बरेच पंखे खरेदी करण्याचा विचार आहे अशी माहिती सेंट्रल रेल्वेचं म्हणणं आहे. हे मोठे मोठे पंखे उपनगरात येतील तेव्हा येतील, पण खरी गरमी चालू व्हायच्या आधी असलेले जुने पंखे किमान दुरुस्त झाले म्हणजे मिळवली.
