घराच्या सजावटीवर भर देताना अनेक पैलूंचा विचार करावा लागतो. याआधीच्या लेखात आपण नियोजनाच्या पहिल्या काही पायर्या बघीतल्या. आजच्या दुसर्या भागात थोड्या कठीण पण आवश्यक बाबींचा आपण विचार करणार आहोत. एकदा हे काम संपत आले की सजवलेल्या घरात बसूनच रहावे असा विचार मनात येतो पण त्या स्टेजला पोहोचेपर्यंतचे काम किचकट आणि वेळखाऊ असते.
लक्षात घ्या ही कामं वारंवार करता येत नाहीत त्यामुळे थोडा धीर धरा- पुरेसा वेळ द्या -कंटाळू नका. एक सुंदर कलाकृती जन्माला येताना वेळ द्यावाच लागतो. चला तर,आता पुढची कामं मन लावून करू या.




