माणसांव्यतिरिक्त माणसाचा जिवाचा जिवलग म्हणजे कुत्रा ! एकवेळ माणसे गद्दारी करतील पण कुत्रा कधीही घात करत नाही हे कुणीही नाकारणार नाही. वेळोवेळी या गोष्टीचा अनुभव लोकांना येत असतो. अनेक सिनेमांची थीम पण या विषयावर बेतलेली आहे. कुत्र्यांच्या प्रामाणिकपणाची प्रचिती देणारी अजून एक घटना बंगळूरूत घडली आहे.
बंगळुरूत घडलेल्या या प्रसंगात अप्पू नावाचा फक्त दीड वर्ष वय असलेल्या या कुत्र्याने एखाददुसऱ्या नाही तर पूर्ण अपार्टमेंट बिल्डींगच्या दीडशे लोकांचे जीव वाचवले आहेत.


