आजवर तुम्ही माणसांना चोरी करताना बघितले असेल. भन्नाटहुन भन्नाट आयडीया लावून लोक चोरी करतात. तर जनावरे किती प्रामाणिक असतात म्हणून आपण नेहमी उदाहरणे देतो. पण आता काळाबरोबर जनावरांनी पण चांगुलपणा सोडला आहे !!
या कुत्र्याने केलेली चोरी भल्याभल्या चोरांनाही लाजवेल !!


ब्राझीलमध्ये एका कुत्र्याचा चोरी करतानाचा विडिओ वायरल झाला आहे. कुत्रा हळूच तिथल्या एका सुपरमार्केट मध्ये जातो आणि डोनटची पिशवी उचलून तेवढ्यात आरामशीर बाहेर जात आहे. असा तो विडिओ आहे. या सुपरमार्केटमध्ये गेल्या काही काळात तीन चोऱ्या झाल्या आहेत. म्हणून त्यांचे आता बारीक लक्ष असते. पण ही चौथी चोरी एक कुत्रा करेल हे त्यांना पण अपेक्षित नसेल.
हा कुत्रा एवढ्या शांततेत शिरला आणि तेवढ्याच आरामाने बाहेर आला जसे आपण काही चुकीचे करत नाही आहोत असे त्याला वाटले असेल. पण जेव्हा लोक ओरडायला लागले तेव्हा गडी घाबरला आणि पळायला लागला. मार्केटच्या बाहेर डोनटची पिशवी सोडून तो पूर्ण ताकदीनिशी पळून गेला.

स्टोरी इथे संपली नाहीये !! तो कुत्रा दुसऱ्या दिवशी पुन्हा आला पण यावेळी त्याला चोरी करण्याची गरज भासली नाही. तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्याला स्वतःहून खाऊ घातले.
एका अर्थी चोरी करून त्याचा फायदाच झाला असे म्हणावे लागेल.
लेखक : वैभव पाटील.