ट्रम्प तात्या पाकिस्तानात कुल्फी विकतायत? हा व्हायरल व्हिडीओ पाहिला का?

लिस्टिकल
ट्रम्प तात्या पाकिस्तानात कुल्फी विकतायत? हा व्हायरल व्हिडीओ पाहिला का?

डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता गेली असली तरी महाराष्ट्रात अजूनही त्यांची ट्रम्प तात्या म्हणून आठवण काढतात. ट्रम्प यांच्यासारखे दिसणारे गृहस्थ मध्यंतरी बाजार घेताना दिसले होते. तेव्हा तो फोटो सोशल मिडियावर प्रचंड वायरल झाला होता. आता पुन्हा एकदा ट्रम्प तात्या पाकिस्तानात दिसले आहेत. ते ही चक्क कुल्फी विकताना!!!

तर तुम्हाला जास्त कोड्यात न टाकता सरळ विषयाला हात घालू. पाकिस्तानातील पंजाबच्या साहिवाल या परिसरातील एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. यात एक गृहस्थ कुल्फी विकताना दिसत आहेत. कुल्फी विकणाऱ्याची बातमी होणे तर शक्य नाही. बर हे गृहस्थ ट्रम्प तात्यासारखे दिसतात म्हणून बातमी झाली का तर तेही नाही.

ट्रम्प तात्यासारखे दिसणारे हे महोदय अतिशय सुरेख आवाजात 'खोया कुल्फी' विकत आहेत. आता भारतात येऊन सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या नावात बदल करणारे ट्रम्प तात्या इतके सुंदर गातात हेच बघून लोक आनंदी झाले. हा व्यक्ती फक्त ट्रम्प तात्यासारखा दिसत नाही तर याचा आवाजही भारी आहे.

याचाच अर्थ गवय्ये आणि खवय्ये अशा दोन्ही प्रकारच्या लोकांसाठी हा डुप्लिकेट ट्रम्प तात्या कामाचा माणूस आहे. व्हिडिओ पाकिस्तानातील असला तरी भारतातीय लोक ट्रम्प तात्यावर विशेष प्रेम करणारे असल्याने इथेच हा व्हिडीओ जास्त व्हायरल होत आहे. 

तर, कसे वाटले हे गाणारे ट्रम्प तात्या? तुमची  प्रतिक्रिया काय?