या वृद्ध जोडप्याला हवंय 'इच्छा मरण'...कारण वाचून सुन्न व्हाल !!

या वृद्ध जोडप्याला हवंय 'इच्छा मरण'...कारण वाचून सुन्न व्हाल !!

‘इच्छा मरण’ किंवा ‘युथनेशिया’ला भारतात कायदेशीर मान्यता मिळालेली नाही. मिळेल अशी चिन्हही दिसत नाहीत. स्वित्झर्लंड, जपान, जर्मनी, अमेरिका या देशांमध्ये युथनेशियाला कायदेशीर मान्यता मिळालेली आहे.

इच्छा मृत्यू म्हणजे जेव्हा एखाद्या असाध्य आजारातून आणि त्याच्या त्रासातून मुक्ती मिळवण्याचा मृत्यू हाच एक उपाय उरतो तेव्हा रुग्णास त्याच्या इच्छे प्रमाणे मृत्यू देणे. असं करणारे आपल्या इच्छेने आपलं जीवन संपवतात. पण भारतात एका वृद्ध जोडप्याने कसलाही असाध्य आजार किंवा शारीरक व्याधी नसताना राष्ट्रपतींकडे इच्छा मृत्यूची मागणी केली आहे. त्यांनी असं का केलं असाव ? चला जाणून घेऊया...

इरावती लवाटे (७८) आणि नारायण लवाटे (८८) मुंबईत ग्रँट रोड भागात राहतात. एका चाळीतल्या वन रूम किचन मध्ये त्यांचा संसार आहे. दोघांना कोणताही आजार नाही पण वय झाल्याने त्यांना भविष्याची काळजी वाटत आहे. पुढे त्यांच्यातील एकाचा मृत्यू होऊन दुसऱ्याला एकटं जगावं लागू नये म्हणून त्यांनी राष्ट्रपतींकडे ‘असिस्टेड सुसाईड’ म्हणजे नातेवाईक किंवा अन्य व्यक्तींच्या मदतीने जीवन संपवण्यासाठी विनंती केली आहे. भविष्याची चिंता हे एकच कारण यापाठी आहे.

स्रोत

नारायण लवाटे राज्य परिवहन मंडळात अधिकारी होते तर इरावती लवाटे या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. दोघांनाही निवृत्त होऊन बरीच वर्ष होऊन गेली. मुलबाळ नसल्याने ते घरात एकटेच राहतात त्यामुळे त्यांच्यातील कोणी जर आजारी पडलं तर त्यांचा सांभाळ कोण करणार आणि त्यांचा आधार कोण ? हा प्रश्न दोघांना सतावतोय. दोघांनाही वाटतं की त्यांचा आता काही उपयोग राहिलेला नाही. एका इंटरव्ह्यू मध्ये तर त्यांनी म्हटलंय की ‘आम्हाला जबरदस्ती जिवंत ठेवणं हा गुन्हा आहे’.

भारतात इच्छा मरण कायदेशीर तर नाहीच पण जर कायदेशीर झालं तरी शरीराने धडधाकट असणाऱ्या माणसाला स्वतःचं जीवन संपवण्याचा अधिकार दिला जाईल का, हा पुढचा तिढा असेल. तूर्तास राष्ट्रपती यावर काय उत्तर देतात ते पाह्ण्यासारखं असेल.

याबद्दल तुम्हाला काय वाटतं ? तुमचं मत आम्हाला जरूर सांगा !!