या बँका बंद होण्याच्या WhatsApp मेसेजवर विश्वास ठेवू नका ! ही केवळ अफ़वा आहे !!

या बँका बंद होण्याच्या WhatsApp मेसेजवर विश्वास ठेवू नका ! ही केवळ अफ़वा आहे !!

कार्पोरेशन बँक -आंध्राबॅक- इंडीयन ओव्हरसीज बँक -सेंट्रल बँक-देना बँक-युनायटेड  बँक-युको बँक-आयडीबीआय बँक-बँक ऑफ महाराष्ट्र या सर्व बँकांतून पैसे काढून घ्या असा एक मेसेज सोशल मिडीयावर विशेषतः व्हॉट्सॅप वरून सतत फिरतो आहे. बँका बुडण्याच्या या बातम्या खोट्या-बिनबुडाच्या -हास्यास्पद आणि तथ्यहीन आहेत असा खुलासा काल केंद्रीय अर्थखात्याने केला आहे.

या सर्व बँकात बुडीत कर्जाचे प्रमाण एका विशिष्ट पातळीवर गेले असल्यामुळे या बँकांना नविन कर्ज प्रकरणांना हाताळाण्यास काही दिवस परवानगी नाकारण्यात आली आहे. ज्या बँकाची अशी स्थिती असते त्या बँकाना रिजर्व बँकेच्या प्राँम्ट करेक्टीव अ‍ॅक्शन (prompt corrective action ) ला सामोरे जावे लागते. गेल्या आठवड्यात रिजर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर यांनी जे निवेदन केले, त्यात त्यांनी prompt corrective action ही एक प्रकारची बँकांना दिलेली वॉर्नींग आहे. या सर्व बॅकांचे रोजचे व्यवहार जसे आहेत तसेच सुरळीत चालू राहतील. PCA  ची कार्य पध्दती डिसेंबर २००२ पासून अंमलात आणली गेलेली आहे आणि  दर वर्षी त्याचे अवलोकन केले जाते. या अवलोकना मुळे आर्थिक शिस्त - Non-Performing Assets (NPA) परसेंटेज आणि त्यांचे भांडवली गुणोत्तर आवाक्यात राहते.

ज्या बँका prompt corrective action खाली येतात त्यांनी बुडीत कर्जाची प्रकरणे तातडीने हाताळून आर्थिक दर्जा वाढवावा अशी अपेक्षा असते. थोडक्यात सांगायचे झाले तर या बँका नविन कर्ज देण्याचे काम वगळता बाकी सर्व काम आहे तसा सुरळीत चालू ठेवतात. या बँका बुडणार ही निव्वळ अफवा आहे.

तर , बोभाटाच्या वाचकांनो हे सर्व लक्षात घ्या. असे मेसेज फॉरवर्ड करू नका. सोप्या भाषेत सांगायचं तर या बँकाना केटी लागली आहे. त्या नापास झालेल्या नाहीत.