संजय तिडके हे ४२वर्षीय गृहस्थ सध्या एका मोहिमेवर आहेत. त्यांना बांधायचे आहे त्यांच्या गावात धरण आणि सोडवायचा आहे पाण्याचा प्रश्न. वाटतेय ना स्वदेश सारखी स्टोरी? तर ही स्टोरी आहे महाराष्ट्रातल्या सांगावी दुर्गवाडा या अकोला जिल्हातल्या गावातली.
हे धरण बांधण्यासाठी खर्च आहे साधारण 20 लाख रुपयांचा. त्यासाठी संजय यांनी आपल्या मालकीची 10 एकर जागा विकून रक्कम उभी केली आहे. सरकारची अनास्था आणि गावातल्या लोकांचे होणारे हाल बघून संजय यांनी हे पाऊल उचलले. सरकारच्या कृषी खात्याला वगळता दुसऱ्या कोणत्याच खात्याने तिडके यांना मदत केलेली नाही.
पुढच्या दोन महिन्यात या धरणाचे काम पूर्ण होईल आणि या धरणात साधारणत: 3 लाख लीटर पाणी साठू शकेल. महाराष्ट्र दुष्काळी परिस्थितीतून जात असताना असे प्रयोग करणाऱ्या संजयभाऊंना आपण प्रोत्साहन दिले पाहिजेच.
