( बोभाटा कोणत्याही राजकीय मताला थारा देत नाही.प्रो किंवा अगेन्स्ट अशा भूमिका घेत नाही. एका त्रयस्थ नजरेतून हा लेख वाचा अशी आमची विनंती आहे)
नक्षलवादी संपतील पण नक्षलवाद संपेल का ? हा आजचा मोठा प्रश्न आहे.मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपवण्याचे घोषणा तर सरकारने केलीच आहे.गेल्या वर्षभराच्या बातम्य जर तुम्ही बघत असाल तर सरकार इन्शुरन्स कंपनीचे एजंट ज्या निष्ठेने अमुक इतकी 'लाईफ' करण्याचं चॅलेंज घेतात त्याच स्पिरिटने सरकार 'नक्षलवादी लाईफ' संपवण्याचं टार्गेट पूर्ण करताना दिसत आहे.
**
तरीपण नक्षलवादी संपतील पण नक्षलवाद संपेल का,हा प्रश्न का पडतो ?
१९७५ साली अनिल बर्वे यांची ‘Thank you, Mr. Glad!’ कादंबरी आली. ही कादंबरी एका डॉक्टर असलेल्या पण आतंकी नक्षलवाद्याच्या संघर्षावर लिहिली गेली होती.या कथेमागे काही त्या काळच्या सत्यकथेचा आधार होता.आज म्हणजे २०२५ साली नंबाला केशव राजू - बसव राजू या ७० वर्षाच्या आतंकी नक्षलवाद्याला पोलिसांनी संपवले.काल संपवलेला नक्षलवादी क्वालिफाईड एंजीनियर होता.ही बातमी बघितल्यावर तुम्हाला समजेल की १९७५ ते २०२५ म्हणजे तब्बल ५० वर्षात परिस्थितीत काहीच फरक पडलेला नाही.




