या लेखासाठी ज्येष्ठ पत्रकार श्री रमेश झवर यांचे आम्ही आभारी आहोत
सिलीकॉन व्हॅली बँक बुडाल्यानंतर अमेरिकेतील बँक व्यवसायात सध्या चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. ह्या चिंतेचे प्रतिबिंब अमेरिकावासी भारतीय आयटी व्यवसायातही पडले. कारण,अनेक आयटी कंपन्यांचे उत्पन्न ह्या बँकेवर अवलंबून होते. अजून ह्या बँकबुडीचा भारतावर कितपत परिणाम होईल ह्याचा पध्दतशीर अभ्यास अर्थ मंत्रालयाने केलेला नाही. एक समिती नेमण्यात आली असून त्या समितीचा नेमका अजेंडा काय हे अजूनही कोणालाही नीटसे उमगलेले नाही.


