या वर्षी आधार कार्ड ९ वर्षांचं झालं. या ९ वर्षांमध्ये १०८ कोटी लोकांकडे आधारकार्ड आलेलं आहे. तुमच्याकडेही असेलच. या आधार कार्डचा वापर अनेक गोष्टींसाठी होतो. म्हणजे बघा.. सीम कार्ड घेण्यासाठी, पासपोर्ट बनवून घेण्यासाठी, इन्कमटॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी, एलपीजी सबसिडीसाठी आणि इतर अनेक कारणांसाठी.
तुमचं आधार कार्ड अशाच काही गोष्टींसाठी वापरलं गेलं असेल. पण आपलं आधार जर का कोण्या दुसऱ्या व्यक्तीने आपल्या नकळत वापरलं असेल तर हे कसं समजणार? आणि आजपर्यंत आपलं कार्ड कोणकोणत्या कामांसाठी आणि कधी वापरलं गेलंय हे समजण्याचा मार्ग काय ? मंडळी, या बाबतीत माहिती मिळवणे शक्य आहे बरं...
तुमच्या आधार कार्डचा आजवरचा वापर जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या स्टेप्स फॉलो करा :


