जिओ मेरे लाल...आता आणखी तीन महिने तुम्हाला जिओची सेवा अगदी फुकट मिळणार आहे...
असे रागावू नका....एप्रिल फुल नाहीये हा...अहो तुमची शप्पत !!!
तर असं आहे कि रिलायंस जिओने प्राईम मेंबरशीपची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढवली असून जे या मुदतीत मेंबर होतील त्यांना तीन महिने इंटरनेट आणि बाकी सर्व सेवा फ्री...फ्री...फ्री असतील.
काल ३१ मार्च असल्यामुळे जिओ धारकांना नैराश्याने ग्रासले होते पण रिलायन्स जिओने प्राइम सदस्यांना 'जिओ समर सरप्राइज' दिले आणि ग्राहकांना तेवढाच दिलासा मिळाला. ज्या ग्राहकांना ३१ मार्चच्या आत प्राईम मेंबर होता आले नाही त्यांना १५ एप्रिल पर्यंत मेंबर होता येईल.
काय आहे 'जिओ समर सरप्राइज' ?
१५ तारखेच्या आत प्राईम मेंबरशीप घेणाऱ्या ग्राहकांसाठी 'जिओ समर सरप्राइज' आहे. या ऑफर अंतर्गत जो ग्राहक ३०३ वा त्यापेक्षा जास्त रुपयांचा प्लॅन घेईल त्याला पुढील तीन महिने सर्व सेवा मोफत मिळतील.
एक लक्षात घ्या जे प्राईम मेंबर नाहीत त्यांच्या सर्व मोफत सेवा आज पासूनच बंद होतील. मेंबरशीप घेत नसाल तर तुम्हाला रिचार्ज केल्यानंतर ऑफर नुसारच डेटा मिळेल.
तर लवकरात लवकर प्राईम मेंबर व्हा आणि अनलिमिटेड मज्जा कंटिन्यू करून घ्या !!!
