घानाच्या अन्न आणि औषध प्रशासनाने येत्या ऑगस्ट २०१६ पासून हायड्रोक्विनन हा ब्लीच करणारा घटक पदार्थ असलेल्या सर्व सौंदर्यप्रसाधनांवर बंदी जाहीर केली आहे. हायड्रोक्विननमुळे कॅन्सर्चे गंभीर आजार होऊ शकतात आणि त्यामुळॆच घाना सरकारने त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
गोरेपणाचं वेड फक्त भारतातच नाही, तर इतर देशांतही आहेच. परंतु उजळपणापेक्षा आरोग्यही तितकेच महत्वाचे, नाही का? घाना सरकारचे या धाडसी निर्णयासाठी अभिनंदन. भारत सरकारही कधी ना कधी जनहितार्थ असा निर्णय घेईल अशी आशा करू या.
