अँड्रॉइड 'ओरिओ' - गुगल अँड्रॉइडच्या नव्या व्हर्जनचे दमदार पदार्पण !!

अँड्रॉइड 'ओरिओ' - गुगल अँड्रॉइडच्या नव्या व्हर्जनचे दमदार पदार्पण !!

सूर्यग्रहण असो वा चंद्र ग्रहण, ग्रहणाच्या दिवशी काहीही करणं निषिद्ध असतं. पण अमेरिकेचं घोडं नेहमी उलटंच चालतं. काळ २१ ऑगस्ट रोजी १०० वर्षांनंतर अमेरिकेत खग्रास सूर्यग्रहण होतं गुगलने या ग्रहणाच्या मुहूर्तावर अँड्रॉइडच्या आठव्या आवृत्तीचे म्हणजे ‘ओरिओ’च्या पदार्पणाचा सोहळा आयोजित केला होता. या नव्या आवृत्तीत काही सुपर पॉवर्स असतील असा दावा गुगलने केला आहे.

ओरिओची ठळक वैशिष्ठे अशी :

१. पिक्चर इन पिक्चर मोड.

२. नोटिफिकेशन डॉट्स.

३. एका वेळेस २ युझर्स अॅप वापरू शकतील.

४. नवीन इमोजी येणार.

 

ओरिओची बीटा व्हर्जन या अगोदर आली होती पण २१ ऑगस्ट पासून होणारे हे पदार्पण अधिकृत असेल. पण ही व्हर्जन सगळ्यांना मिळे पर्यंत वेळ लागणार आहे कारण सुरुवातीला ही ऑपरेटिंग सिस्टम फक्त गुगलच्या पिक्सल आणि नेक्सस या डिव्हाईस वरच मिळतील.

चला तर बघूया अँड्रॉइडचे या आधीचे ऑपरेटिंग सिस्टम कुठली होती ?

 

अँड्रॉइडच्या सुरुवातीच्या २ आवृत्त्यांना विशेष असे नाव नव्हते पण त्यानंतर अल्फाबेट C पासून आवडत्या चॉकलेट, केकची नावं देण्यास सुरुवात झाली.

१. C - कपकेक

२. D - डोनट

३. E - इक्लेअर

४. F - फ्रोयो

५. G - जिंजरब्रेड

६. H - हनिकोंब

७. I - आईस्क्रीम सॅड्वीच

८. J - जेलीबीन

९. K - किटकॅट

१०. L - लॉलीपॉप

११. M - मार्शमेलो

१२. N - नोगट

१३. O – ओरिओ

 

अल्फाबेट प्रमाणे पुढचं अक्षर ‘P’ असणार आहे त्यामुळे आत्तापासूनच मागणी होत आहे की येणाऱ्या नव्या व्हर्जनला ‘पार्लेजी’ हे नाव द्यावं !! मंडळी जेव्हा ‘N’ अक्षरापासून नवीन व्हर्जन येणार होतं होतं त्यावेळीसुद्धा अश्या बातम्या येत होत्या की दक्षिण भारतीय ‘नय्यप्पम’ या पदार्थाचं नाव नव्या व्हर्जनला दिलं जाणार आहे पण शेवटी ‘नोगट’ नाव ठरवण्यात आलं. आता हे भविष्यच सांगेल की p फॉर पार्लेजी होतो की आणखी काही !!

 

बोभाटाच्या ओरिओची स्टोरी इथे मिळेल :

ओरिओच्या गमती जमती !!!