काम टाळण्यासाठी या माणसाने दिलंय अफलातून कारण. तुम्ही या कारणाचा कधी विचार केला होता का??

काम टाळण्यासाठी या माणसाने दिलंय अफलातून कारण. तुम्ही या कारणाचा कधी विचार केला होता का??

मंडळी, काम टाळण्यासाठी आपण पोट दुखी पासून ते आजी आजोबाला मारण्या पर्यंत सगळे बहाणे करतो. पण या माणसाने जो बहाणा केला आहे त्याचा आपण विचारही करू शकत नाही. या माणसाने आपण चक्क कल्कीचे अवतार असून आपण तपस्या करत असल्याने ऑफिसला येऊ शकत नाही असं कारण दिलं आहे.

राव, हे आहेत फेफर. रमेशचंद्र हे सरदार सरोवर निगमच्या वडोदरा कार्यालयात अभियंता म्हणून काम करतात. गेल्या ८ महिन्यात ते फक्त १६ दिवस कामावर हजर राहिले आहेत. त्याच्या दांड्या बघून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यावर त्यांनी मोठं अजब कारण पुढे केलं.

स्रोत

“मला जगाची चिंता आहे. त्यासाठी मी तपस्या करत आहे. मला ऑफिस मध्ये तपस्या करता येणार नाही त्यामुळे मी ऑफिसला येऊ शकत नाही. माझ्या तपस्येमुळे गेल्या १९ वर्षात भारतात चांगला पाऊस पडला आहे.”

याबरोबरच ते पुढे म्हणाले, “तुम्हाला विश्वास बसणार नाही पण मी विष्णूचा दहावा अवतार कल्की आहे. ते काही दिवसातच सिद्ध होईल.”

राव, त्यांना हा साक्षात्कार २०१० साली झाल्याचं ते म्हणाले. त्यांनी इथेच न थांबता एका इंटरव्हू मध्ये सांगितलं की मला देवी दुर्गा आणि विष्णू यांच्याकडून मानवतेच्या भल्यासाठी काम करण्याचा आदेश मिळाला आहे.

मंडळी, रमेशचंद्र फेफर यांची बातमी व्हायरल झाल्यानंतर सर्व पत्रकार त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं ते तुम्ही खालील व्हिडीओ मध्ये पाहू शकता.

राव, यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा. कमेंट बॉक्सचा वापर करा राव !!