एलन मस्कने ट्विटर खरेदी केल्याची बातमी आल्यापासून सगळीकडे ट्विटरचीच हवा आहे. मेटा, इन्स्टाग्राम आणि व्हाट्सअपच्या तुलनेत ट्विटरचे वापरकर्ते कमी असले तरी एलन मस्कच्या हाती गेल्यावर ट्विटर नक्कीच उंच भरारी घेईल अशी अनेकांना खात्री आहे. अशावेळी झुकरबर्गला पुन्हा एकदा आपले प्लॅटफॉर्म कसे चर्चेत येतील हे पाहणे भाग होते. म्हणून त्याने यावेळी व्हाट्सअपमध्ये काही लक्षवेधी बदल केले आहेत. विशेष म्हणजे मार्कने स्वतः एक फेसबुक पोस्ट करत व्हाट्सअपवर आलेल्या नव्या फीचर्सची माहिती दिली आहे. चला
१) ग्रुप सदस्यांची मर्यादा वाढली
आधी एका व्हाट्ससप ग्रुपवर एकावेळी फक्त २५६ लोक ऍड करता येत होते. यामुळे एखादा महत्वाचा ग्रुप फुल झाला की मग बाहेर राहिलेल्या लोकांना ही मर्यादा वाढायला पाहिजे लेका, अशी भावना येत होती. आता निवांत पब्लिकला ग्रुपवर ऍड करता येणार आहे. २५६ ची मर्यादा वाढवून आता डबल म्हणजे ५१२ करण्यात आली आहे.
२) ऍडमीनचे अधिकार वाढवले
व्हाट्सअप ग्रुपचा ऍडमीन म्हणजे काय सोपा विषय नाही. २५६ लोकांना एका ठिकाणी सांभाळून ठेवणे म्हणजे काय खायचं काम नक्कीच नाही. वरून कोन काय टाकेल आणि ऍडमीन अडचणीत येईल याचा नेम नाही, म्हणून ऍडमीन कायम टेन्शनमध्ये अशी परिस्थिती. कोणी काही चुकीचे टाकले की एकेकाला दादा डिलीट कर रे म्हणून विनवण्या कराव्या लागत. पण आता चिंता नॉट!!! मार्कभाऊने ऍडमीनला ग्रुपवरील कोणताही मॅसेज डिलीट करता येण्याचा अधिकार आता दिला आहे.
३) २ जीबी पर्यंत फाईल शेयर करता येईल
आधी १०० एमबी पेक्षा जास्तची फाईल असेल तर लोकांना टेलिग्रामच्या सहाय्याने घेऊन ती शेयर करावी लागत असे. थोडी जरी फाईल मोठी असली तरी ती व्हाट्सअपद्वारे शेयर करता येत नव्हती. पण आता यात मालकांनी घसघशीत वाढ केली आहे. तब्बल २ जीबीची फाईल आता व्हाट्सऍपच्या माध्यमातून पाठवता येणार आहे.

