ब्रम्हचारी मोरावरून जजसाहेबांवर होतीय टोलेबाजी...!!!

ब्रम्हचारी मोरावरून जजसाहेबांवर होतीय टोलेबाजी...!!!

आपल्या देशातल्या माणसांना झालंय काय च्यायला? ढिंच्याक पूजापर्यंत ठीक होतं पण उच्च न्यायालयाचे न्यायाधीशसुद्धा? अरे काय चाललंय काय?

आता तुम्ही म्हणाल ‘काय झालं बे, काऊन ओरडतोय?’ आता ओरडायचं नाय तर काय करायचं राव!! या जज साहेबांनी तर मोराला आलोकनाथपेक्षा पण जास्त संस्कारी ठरवलंय. आता यांच्या मते मोर हा आजन्म ब्रम्हचारी वगैरे पक्षी आहे. तो कधीही सेक्स करत नाही (हसू नका. मुख्य जोक तर पुढे आहे). मोराच्या डोळ्यातून निघणारे अश्रू हे लांडोर पिते आणि त्यामार्फत ती गर्भवती होते असला भारी शोध लावलाय यांनी.

अर्थात म्हणजे अर्थातच हे चूक आहे. असं कधी असतंय का? मोर एवढा इमानदार? राष्ट्रीय पक्षी आहे म्हणून काय झालं? हे शोध बघून काही शास्त्रज्ञ जग सोडण्याची भाषा करतायत मंडळी. पण असो...

न्यायाधीशांनी तर आपले अकलेचे तारे तोडले पण माणसं कशी गप्प बसणार, त्यांनी जोक्सचा पाऊस पडायला सुरुवात केलीये...बघा तरी काय काय काय म्हणाले लोक्स !!!

तुम्हाला पण काही म्हणायचं आहे का यावर...? कमेंट बॉक्स मध्ये बोला की मग !