माणसाचं अमानुष रूप  : तीन दिवसांच्या बाळासोबत पाहा त्याने काय केलं... 

माणसाचं अमानुष रूप  :  तीन दिवसांच्या बाळासोबत पाहा त्याने काय केलं... 

आपण कधी कधी सिनेमा बघतानाही इमोशनल होऊन ढसाढसा रडायला लागतो... पण काही नमुने मनाने इतके कठोर असतात की त्यांना लहान-मोठं, स्त्री-पुरूष, असा काहीही फरक जाणवत नाही. त्यांचं क्रौर्य कोणालाही कधीही घातक ठरतं. अशाच एका निर्दयी प्रवृत्तीचं दर्शन घडलंय उत्तराखंडमध्ये... 

            उत्तराखंडच्या रूडकी(रूरकी) जिल्ह्यातल्या एका खाजगी दवाखान्यातली ही घटना आहे. २५ जानेवारीला या हॉस्पिटलमध्ये एका ३ दिवसांच्या बाळाला भरती केलं गेलं. या बाळाला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. हे बाळ ज्या खोलीत होतं, त्याच खोलीत हा विकृत मनोवृत्तीचा वॉर्डबॉयही हजर होता. जेव्हा बाळ रडायला लागलं, तेव्हा त्रासून या वॉर्डबॉयनं त्या बाळाजवळ येऊन त्याचा पाय असा काही खेचला की तो पाय फ्रॅक्चर झाला! बाळाचं रडणं वाढलं. पण तेव्हाही हा वॉर्डबॉय त्या बाळाला एखाद्या खेळण्याप्रमाणेच हाताळत होता. सुदैवानं हा सगळा प्रकार कॅमेर्‍यात कैद झालाय. पण अगदी कठोर हृदयाच्या लोकांनाही हा व्हिडिओ पाहाताना नकोसं होईल. 
 
      जेव्हा डेहराडूनमधल्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी बाळाचा पाय फ्रॅक्चर असल्याचं सांगितलं तेव्हा हा प्रकार बाहेर आला. आणि अखेर  पोलिसांनी या वॉर्डबॉयला ताब्यात घेतलं. त्या बिचार्‍या चिमुकल्या जीवानं या महाशयांचं काय  बरं घोडं मारलं होतं....