काय मग, आज पतंग उडवायचा कार्यक्रम ठरला की नाही? संक्रात म्हणजे तिळगूळ हे जसं आपल्या डोक्यात बसलं आहे तितकंच खरं आहे- हे पतंगाचं नातं. मकर संक्रात हा आपला एकमेव सण आहे जो आपण तिथीने साजरा ना करता तारखेनुसार साजरा करतो. भारताच्या प्रत्येक राज्यात तिथल्या भौगोलीक परिस्थिती, संस्कृतीनुसार हा सण साजरा केला जातो. प्रत्येक राज्यात या सणाला वेगळंच नांव आहे.
तर आज आपण बघूयात हा सण नक्की कुठं आणि कसा साजरा केला जातो ते...





