शॉपींगवेड्या बायकांच्या त्रस्त नवर्‍यांसाठी चिन्यांनी लढवलीये नामी शक्कल!!

शॉपींगवेड्या बायकांच्या त्रस्त नवर्‍यांसाठी चिन्यांनी लढवलीये नामी शक्कल!!

खरोखरच नवरा हा अक्षरशः एक ओझं वाहणारा बैल असतो, याची प्रचिती त्या प्रत्येक वेळी येते जेव्हा जेव्हा तो आपल्या भरमसाठ आणि अनावश्यक शॉपिंग करणार्‍या बायकोच्या पाठीमागून हताशपणाणे ओझी घेऊन इकडून तिकडे फिरताना दिसतो. राव, पर्सनली घेऊ नका. इथे सगळ्यांची अवस्था सारखीच आहे. पण चीनमधल्या अशा बिचार्‍या नवर्‍यांसाठी तिथल्या एका मॉलवाल्याने जरा चांगला विचार केलेला दिसतोय... 


शांघायमधल्या ग्लोबल हार्बर नावाच्या या हाय-एन्ड मॉलमध्ये अशा 'अॅन्टी शॉपींग' लोकांसाठी खास बूथ बनवण्यात आलेत. यांना हजबन्ड रेस्ट हाऊस असं साजेसं नाव आहे. या बुथ्समध्ये अशा नवरोबांसाठी आरामदायक मसाज चेअर ठेवलेली आहे. समोर एक स्क्रीनही बसवलेली आहे, जिच्यावर ते टीव्ही पाहू शकतात किंवा व्हीडीओ गेम्स खेळू शकतात! ज्यांना बायको किंवा गर्लफ्रेंडसोबत शॉपींग करण्याचा तिटकारा आहे अशांसाठी हे बुथ म्हणजे वरदान ठरू शकतं. महत्वाचं म्हणजे हे बुथ मोबाईलवरून बुक करून अगदी मोफत वापरता येतील. 

स्त्रोत

स्त्रोत

या मॉलमध्ये असे 4 बुथ्स बसवण्यात आले आहेत आणि या एका बूथची किंमत 4 लाखांच्या आसपास जाते! ते काही असो, तिथल्या बर्‍याच लोकांना ही सुविधा जाम पसंत आलीय. पण अशातही काही बायकांचे "मी एकटी कशी शॉपींग करू?", "माझा नवरा ते बुथ सोडून हलणारच नाही" इत्यादी गंभीर(!!) अभिप्रायही आलेत. आणि पतीच्या बंधनात न अडकता बायकांनी केलेली मनमुराद शॉपींग नंतर या नवरोबांच्या पोटात गोळा आणेलच की!!