उशीर झालाय ? हरकत नाही- इनकम टॅक्स रिटर्न भरण्यास मुदतवाढ !!

उशीर झालाय ? हरकत नाही- इनकम टॅक्स रिटर्न भरण्यास मुदतवाढ !!

३१ जुलै, इनकम टॅक्स रिटर्न्स भरण्याची अंतिम तारीख होती पण शेवटचा दिवस असल्याने इनकम टॅक्सच्या वेब साईटवर इतका भार पडला की कर भरण्याची शेवटची तारीख पुढे ढकलण्यात आली असून आता तुम्हाला ५ ऑगस्ट पर्यंत तुम्हाला इनकम इनकम टॅक्स रिटर्न्स भरता येणार आहे.

अनेक जणांकडून तक्रारी आल्या नंतर हा निर्णय घेण्यात आला. ही समस्या तशी आधीच दिसून येत होती पण मुदत वाढ केल्याची बातमी आधीच कळल्या नंतर लोक ३१ जुलै ला कर भरणार नाहीत म्हणून आज दुपारी ही बातमी उघड करण्यात आली.

सर्वर डाऊन होण्याचा खरा फायदा आज आयकर भरणाऱ्यांना झालाय राव .... नाही का ?

आयकर विभागाने केलेलं ट्विट :

 

एका CA ने दुपारी केलेलं ट्विट; यावरून परिस्थिती तुमच्या लक्षात येईल :