अ‍ॅपल डिझाईन अवॉर्ड्समध्ये या भारतीय अ‍ॅपने बाजी मारली आहे...

लिस्टिकल
अ‍ॅपल डिझाईन अवॉर्ड्समध्ये या भारतीय अ‍ॅपने बाजी मारली आहे...

अ‍ॅपल कंपनीकडून दरवर्षी अ‍ॅपल डिझाईन अवॉर्ड्स जाहीर होतात. तंत्रज्ञान क्षेत्रात काहीतरी भरीव काम करणाऱ्या लोकांना हे पुरस्कार दिले जातात. जगभरच्या तंत्रज्ञान क्षेत्रात या पुरस्काराची मोठी प्रतिष्ठा आहे. यावर्षी अ‍ॅपल डिझाईन अवॉर्ड्सकडे भारतीयांनी विशेष लक्ष द्यायची गरज आहे, कारण एका भारतीय व्यक्तीने या पुरस्कारावर आपली छाप उमटवली आहे.

यावर्षी अ‍ॅपलकडून ६ नविन विभाग ठेवण्यात आले होते. इनोव्हेशन, ग्राफिक्स, व्हिज्युअल, इन्टराक्शन, डिलाइट अँड फन, इन्क्लुजीविटी आणि सोशल इम्पॅक्ट हे ते ६ विभाग.

भारतीय अ‍ॅप डेव्हलपर संदीप रानडे यांनी बनवलेल्या संगीतावर आधारित अ‍ॅप नादसाधनाला हा पुरस्कार मिळाला आहे. नादसाधना हे ऑल इन वन संगीत अ‍ॅप आहे. संगीतकारांना मदत करण्यासाठी हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने संगीतकार आपले संगीत अधिक चांगले तयार करू शकतात तसेच ते पब्लिश देखील करू शकतात.

या अ‍ॅपमध्ये सुरुवातीला फक्त भारतीय शास्त्रीय संगीताची सुविधा उपलब्ध होती, पण आता या अँपमध्ये  ७ वेगवेगळ्या पद्धतींचे संगीत आहे. हे अ‍ॅप आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि कोर मशीन लर्निंग सोबत काम करते.

 

 

Apple Design Award winner NaadSadhana: from a simple tuner to a complex AI  Classical music creator - The Hindu

स्रोत

नादसाधना हे अ‍ॅप बनविणारे संदीप रानडे हा सन्मान मिळाल्यावर प्रचंड खुश आहेत. त्यांनी आपल्याला ऑस्कर मिळाल्याचा आनंद होत आहे अशी भावना व्यक्त केली. एका भारतीय व्यक्तीला हा पुरस्कार मिळाल्याने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देखील भारतीयमागे राहिलेले नाहीत हे सिद्ध होत आहे.

आता इतर विजेत्यांकडे वळूया

आता इतर विजेत्यांकडे वळूया

अ‍ॅपलकडून इन्क्लुजीविटी कॅटेगरीत व्हॉइस ड्रीम आणि होलोविस्टा हे अ‍ॅप निवडण्यात आले. या कॅटेगरीत विजेते ठरलेल्या अ‍ॅप्सनी वेगवेगळ्या भागात राहून वेगवेगळी भाषा बोलणाऱ्या लोकांना एकमेकांशी जोडण्यास होण्यात मदत केली आहे. 

(पोक पोक प्लेरूम)

डिलाइट अँड फन या कॅटेगरीत पोक पोक प्लेरूम आणि लिटल ऑफर्स अ‍ॅप हे जिंकले आहेत. इन्टरॅक्शन कॅटेगरीत इन्टरॅक्टिव्ह इंटरफेस आणि एफर्टलेस कंट्रोल यासाठी कॅरेट वेदर अ‍ॅप, ग्रेलर एलएलसी अ‍ॅप आणि बर्ड एलोन अ‍ॅप यांना निवडण्यात आले आहे.

तर, सोशल इम्पॅक्ट कॅटेगरीमध्ये वापरकर्त्यांचे आयुष्य सुकर  करण्यासाठी बी माय आयज अ‍ॅप आणि अल्बा गेम यांना विजेते घोषित करण्यात आले. सोबतच व्हिज्युअल आणि ग्राफिक्स कॅटेगरीत चांगल्या प्रतीचे इमेज आणि क्वालिटी ऍनीमेशन्ससाठी लुना अ‍ॅप आणि जेनसिन इम्पॅक्ट गेम्स यांना विजेते घोषित करण्यात आले आहे.

शेवटी, पुढील यादीत जास्तीत जास्त भारतीय अ‍ॅप असतील अशी आपण अशा करूया.