तुम्हांला माहित आहेच की भारतात सर्वोच्च मान हा 'भारतरत्न' या किताबाला आहे. त्यापुढे मात्र नागरी आणि लष्करी किताब हे वेगवेगळे मानले जातात. तुम्हांला परमवीरचक्र, अशोकचक्र, महावीरचक्र, कीर्तीचक्र, शौर्यचक्र अशी काही नावं ऐकून माहित असतील, पण त्यातलं कोणतं मोठं? त्यांची उतरंड काय वगैरे माहिती सर्वसाधारणपणे सगळ्यांनाच असते असे नाही. म्हणूनच आज आम्ही घेऊन आलो आहोत भारतीय लष्करातल्या शौर्य पदकांबद्दलची माहिती..

(सावित्रीबाई खानोलकर)
यातली बरीचशी पदकं, म्हणजेच अशोकचक्र, महावीरचक्र, परमवीरचक्र, कीर्तीचक्र, शौर्यचक्र, वीरचक्र यांचं संकल्पनाचित्र बनवलं आहे सावित्रीबाई खानोलकरांनी. मूळच्या स्वित्झर्लंडच्या या बाई भारतात आल्या आणि 'चुकून युरोपात जन्माला आले' म्हणण्याइतक्या भारतीय झाल्या. त्यांचा हिंदू संस्कृती आणि प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास पाहाता या पदकांच्या डिझाईनचं काम त्यांनाच देण्यात आलं होतं.






