आपण सगळ्यांनीच लहानपणी आजूबाजूच्या लोकांचा डोळा चुकवून माती खाल्लीय. एवढंच काय, सगळ्यांनीच शाळेत जात असताना पेन्सिली वापरून कमी आणि खाऊन जास्त संपवल्या असतील. पण या दोन बायकांची कहाणीच वेगळी आहे. कशी ते आता वाचाच..
या जगात सापडतील तितके नमुने थोडेच असतात. त्यांच्या चित्रविचित्र करामती पाहून देवही कधीकधी तोंडात बोट घालत असेल. असल्याच दुर्मिळ प्रजातीच्या या दोन आजीबाई आपल्या भारतात आढळतात, ज्या गरम गरम तूप-भात खायचं सोडून माती खातात!






