मिस युनिव्हर्स व मिस अर्थच्या बरोबरच ‘मिस वर्ल्ड’ (विश्व सुंदरी) ही स्पर्धा देखील तितकीच महत्वाची मानली जाते. मिस वर्ल्ड स्पर्धेत प्रवेश मिळवण्यासाठी प्रत्येक स्पर्धकाला त्यांच्या देशातील सौंदर्य स्पर्धा जिंकणे भाग आहे. म्हणजेच भारतीय मॉडेलला सर्वात आधी ‘फेमिना मिस इंडिया’ हा खिताब मिळवावा लागतो.
१७ वर्षापूर्वी म्हणजेच २००० साली ‘प्रियांका चोप्रा’ विजेती ठरली होती पण त्यानंतर कोणत्याही भारतीय सुंदरीला ही संधी मिळाली नाही. मंडळी, पूर्वी मिस वर्ल्ड खिताब जिंकलेल्या देशांच्या यादीत व्हेनेझुएला नंतर भारताचा दुसरा क्रमांक लागत होता पण आता भारत व्हेनेझुएलाच्या बरोबरीला आला आहे. आता पर्यंत एकूण ६ भारतीय महिलांना हा खिताब मिळालाय.
आज आपण बघणार आहोत मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकलेल्या ६ भारतीय महिला !






