तर मित्रांनो, कसा साजरा केला प्रजासत्ताक दिन?
मग आज राजपथवरची परेड पाहिलीत कि नाही? या वेळेस अबुधाबीचा शेख चीफ गेस्ट होता म्हणे. तर चीफ गेस्टने आपल्या आमंत्रणाचा मान राखून बुर्ज खलिफावर केलेली तिरंग्याची रोषणाई पण पाहून झाली असेलच. तर मिडल इस्टशी आणि एकूणच अरब राष्ट्रांशी असलेली आपली दोस्ती बघता आज आम्ही एक व्हायरल व्हिडीओ घेऊन आलो आहोत. अहो, आम्हाला चक्क अरबी भाषेत गायलेलं जन-गण-मन सापडलंय. कुठं म्हणजे काय? इथंच व्हाट्सऍप वर. भाषा जरी वेगळी असली तरी आम्हाला तर बुवा सेम राष्ट्रगीताच्या अभिमानाचं फिलिंग आलं..
