लोकहो १६जूनपासून पेट्रोल डीझेलचे भाव रोज बदलणार आहेत. खरं तर या आधीच १ मे पासून उदयपूर, जमशेदपूर, पद्दुचेरी, चंदीगढ आणि विशाखापट्टणम या पाच शहरांत हा प्रयोग सुरु झाला होता. पण आता मात्र देशभरात पेट्रोल-डीझेलच्या किंमती रोज बदलण्याची पद्धत सुरु करणार असल्याचं इंडियन ऑईलकडून सांगितलं जातय.
राव, आता हे रोज किमती बदलणार. मग आपल्याला कसं कळणार, आज कोणता भाव चालू हाय, नाय का ? यावर सोप्पा उपाय म्हणून इंडियन ऑईलकडून एक अॅप लाँच करण्यात आलंय मंडळी. या मोबाईल अॅपमुळे तुम्हाला पेट्रोलच्या किमतीत होणारे चढ-उतार घर बसल्या बघता येतील. एवढंच नाही तर देशभरातल्या सर्व शहरात सध्या कोणती किंमत चालू आहे हे सुद्धा पाहता येईल.
Fuel@IOC असं या अॅपचं नाव आहे. हा अॅप तुम्ही गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करू शकता. अॅप बरोबरचं तुम्हाला SMS द्वारेही माहिती मिळवता येईल. त्यासाठी तुम्हाला RSP < स्पेस > ‘डीलरचा कोड’ असा SMS ‘9224992249’ या नंबर वर पाठवावा लागेल. प्रत्येक पेट्रोल पंपवर डीलरचा कोड डिस्प्ले होत असतो तो घेऊन तुम्ही SMS करू शकता. www.iocl.com या वेबसाईटवरही तुम्ही रोजचे दर बघू शकता.
किंमतीत सतत बदल करण्याला डीलर्सचा विरोध आहे> पण तेल कंपन्या या निर्णयावर अगदी ठाम आहेत. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तिन्ही कंपन्यांनी हा निर्णय घेतलाय.
