स्मगलर्स ही जमात आपल्याला टीव्ही-सिनेमात बघून माहित असते. पण आजकाल या स्मगलर्सना पकडल्याच्या आणि त्यांच्या सोनं-हिरे-पैसे दडवण्याच्या भन्नाट आयडियांच्या बातम्या खूपच येत आहेत असं वाटत नाही का तुम्हांला?
काल-परवापासून २०००रूपयांच्या नोटांचं स्मगलिंग करण्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अशा बातम्यांचा शोध घेतला, आणि चोरांच्या काही वाटा समजल्या. अर्थात या अशा लोकांना पकडणं हे एअरपोर्टवरच्या अधिकार्यांचं यश. बरोबर लोक हुडकून, स्मगलिंगचा माग काढणं सोपं नाही. हो, पण या पद्धती सापडल्या म्हणून कळाल्या तरी. अशा न कळालेल्या अजून किती आयडिया चोरांकडे आहेत कोण जाणे!!






