तर काय भाऊ लोक्स, तुम्ही जंगलात बिंगलात जाऊन टायगर सफारी करता का नाही??? गेल्या काही वर्षांत आपल्या सारख्या लोकांनीच या वाघाचे बारसे करायला सुरवात झाली आणि यातूनच जन्म झाला सेलिब्रिटी वाघांचा. या वाघांचे एक स्वतंत्र असे अस्तित्व निर्माण झालंय. यातले काही वाघ तर पर्यटकांना फोटो देण्यासाठी पण प्रसिद्ध झालेत. यामुळे वाघाच्या संवर्धनात हातभार लागतो का नाही याबाबत मात्र दुमत आहे. पण अशा प्रयोगांमुळेच वाघाचे संवर्धन हे चर्चेत राहते आणि त्याचा काही अंशी फायदा होतो. महाराष्ट्रातला जय हा वाघ बऱ्याच दिवसांत दिसला नाही, तेव्हा त्याची मोठी बातमी झाली आणि वनखात्याला अनेक प्रश्नांना उत्तर द्यावे लागले. जर हा वाघ प्रसिद्ध नसता तर कदाचित कधीच ही माहिती बाहेर आली नसती. तर आज आम्ही अशाच काही सेलिब्रिटी वाघांची माहिती घेऊन आलोय. यातले काही वाघ आता अस्तित्वात नाहीत, पण जे आहेत त्यांना तुम्ही एकदा प्रत्यक्षात बघाच..





