काळा-घोडा की 'हिरवा-घोडा कला महोत्सव' ? पाहा काही क्षणचित्र !!

लिस्टिकल
काळा-घोडा की 'हिरवा-घोडा कला महोत्सव' ? पाहा काही क्षणचित्र !!

मुंबईच्या काळा-घोडा परिसरात भरणारा ‘काळा-घोडा आर्ट फेस्टिव्हल’ला दरवर्षीप्रमाणे ३ फेब्रुवारी पासून सुरुवात झालेली आहे. दरवर्षी फुकटात कार्यक्रम आयोजित करण्याबाबत महोत्सवाला आणि राज्य सरकारला यावेळी मुंबई हायकोर्टाने खडे बोल सुनावलेत. त्यामुळे ३ फेब्रीवारीला महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. याच बरोबर आणखी काही कार्यक्रम रद्द झालेत.

मंडळी यावर्षी थोडं विघ्न आलं असलं तरी कलाकारांच्या या कुंभमेळ्याला लोकांनी नेहमीप्रमाणे डोक्यावर घेतलं आहे. काळा घोडा फेस्टिव्हलची खासियत म्हणजे कला, नृत्य, संगीत, रंगभूमी, सिनेमा, साहित्य यांची मांदियाळी. याच बरोबर दरवर्षी वेगवगेळ्या थीम मधून काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल साकार होत असतो. यावर्षीची थीम आहे ‘ग्रीन’. अर्थात यावर्षी सगळं काही निसर्गाला समर्पित असेल.

निसर्ग आणि पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी म्हणून यावर्षी ‘ग्रीन’ ही थीम निवडण्यात आली आहे. म्हणजेच काळा घोडा यावर्षी चक्क ‘हिरवा घोडा’ झाला आहे.

चला तर बघुयात मुंबईच्या या शानदार कला महोत्सवाची बोभाटाने टिपलेली काही क्षणचित्रे :