बंगळूरच्या महानगरपालिकेने (बीबीएमपी) नुकतीच एक घोषणा केली आहे ज्यामुळे त्याचं भरभरून कौतुक होत आहे. १ जानेवारी म्हणजे वर्षाच्या पहिल्या दिवशी ज्या मुलींचा जन्म होईल त्यांना तब्बल ५ लाख रुपये देण्यात येणार असल्याचं या घोषणेत म्हटलंय.
१ जानेवारी रोजी सरकारी हॉस्पिटल्स मधून नॉर्मल डिलिव्हरी द्वारे जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीच्या खात्यात ५ लाख रुपये जमा करण्यात येणार आहेत. हे खातं खरं तर मुलगी आणि बीबीएमपी चे कमिश्नर यांचं जॉइंट अकाऊन्ट असणार आहे. मुलीच्या भविष्यासाठी आणि तिच्या शिक्षणासाठी महत्वाची तरतूद म्हणून ही रक्कम दिली जाईल.
आजही आपल्या घरात अनेकांना मुलगा जन्मावा असच वाटत असतं. त्यामुळे मुलीच्या जन्मासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून देखील हे एक महत्वाचं पाऊल असणार आहे.
वर्षाची सुरुवात आणि घरात कन्यारत्न येण्याचा आनंद यामुळे द्विगुणीत होईल यात काही शंका नाही.
