मांजर आणि उंदराच्या पकडापकडीची सोप्पी गोष्ट म्हणजे ‘टॉम अँड जेरी’ शो. या सोप्प्या संकल्पनेला 'विल्यम हॅना' आणि 'जोसेफ बारबेरा' यांनी ज्या पद्धतीने मांडलं ते अफलातून होतं. आजवर अनेक कार्टून शो आले आणि गेले, पण टॉम अँड जेरीशी कोणालाही स्पर्धा करता आलेली नाही. हे आजचे तरुण नक्कीच मान्य करतील. आजही टॉम अँड जेरीचे युट्युबवरचे एपिसोड लोक मनापासून बघतात आणि खळखळून हसतात.
आज टॉम अँड जेरीची आठवण काढण्यामागचं कारण म्हणजे 'टाकू इनेवू' या जपानी कलाकाराने टॉम अँड जेरीला दिलेली आगळीवेगळी श्रद्धांजली. ‘टॉम अँड जेरी’मधल्या वेगवेगळ्या क्षणांच्या आधारावर त्याने शिल्पं तयार केली आहेत. जसे की जेरीने अख्खा चीज गिळल्यानंतर त्याचा झालेला त्रिकोणी आकार, टॉमच्या चेहऱ्याला गरम इस्री लागल्यावर त्याचा चेहरा इस्त्रीच्या आकाराचा होतो, टॉम दारावर आपटल्यानंतर त्याचा झालेला चेहरा, इत्यादी.
आम्ही सांगण्यापेक्षा तुम्हीच पाहून घ्या.















