भारतीय वंशाची प्रथम महिला अंतराळवीर म्हणून आपल्या सर्वांच्याच अभिमानाचा विषय असलेल्या कल्पना चावलाचा १ फेब्रुवारी २००३ साली अवकाशात झालेल्या स्फोटात दुदैवी अंत झाला. कोलंबिया अवकाशयानात झालेल्या स्फोटाने अक्षरशः यानाचे तुकडे तुकडे झाले होते.
कल्पना चावला आता आपल्यात नाही, पण अवकाशात असताना तिने आपले त्यावेळचे पंतप्रधान 'आय. के. गुजराल' यांच्यासोबत थेट अवकाशातून संवाद साधला होता. मित्रांनो आपल्या सुदैवाने त्या संवादाचा व्हिडीओ आता उपलब्ध झाला आहे. पंतप्रधान गुजराल यांनी प्रत्येक भारतीयांच्या मनात असलेली एक गोष्ट तिला सांगितली, ती म्हणजे ‘आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो’.
शेवटी एवढंच सांगेन की व्हिडीओ पाहत असताना आपली मान अभिमानाने नक्कीच उंचावेल यात काही शंका नाही.
