शौचालय बांधण्यासाठी भीक मागणारा सरपंच !!!

शौचालय बांधण्यासाठी भीक मागणारा सरपंच !!!

नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियानाची हाक दिलेली असताना त्याचा अनेक ठिकाणी चांगला परिणाम दिसून आला. या मोहिमेचा एक आगळा वेगळा परिणाम सध्या कर्नाटकात दिसून येतोय. कर्नाटकाच्या एका गावातील सरपंच शौचालय बांधण्यासाठी जनतेकडे भीक मागताना दिसत आहे. श्रीनिवास कार्तुरी असे या सरपंचांचे नाव.

पाया पडून, भीक मागून, विनवणी करून श्रीनिवास लोकांना घरी शौचालय बांधण्यास विनवणी करत असतात. गावातील लोक सरपंचांच्या अश्या वागण्याने गोंधळून जात असले तरी सरपंचांची ही आयडिया काम करत असल्याच दिसून येत आहे. अनेकांनी घरी शौचालय बांधायला सुरुवात केली आहे.

गावात २१०० कुटुंब राहत असून ४४१ कुटुंबांनी घरी शौचालय बांधले आहेत. उरलेल्या सगळ्यांना उघड्यावर जावे लागते म्हणून ज्यांना आर्थिक कारणामुळे शक्य नाही अश्यांना स्वखर्चाने शौचालय बांधून द्यायला देखील श्रीनिवास तयार आहेत.

स्वच्छ भारत अभियानला घरोघरी पोहोचवण्यासाठी झटणारे असे सरपंच महाराष्ट्रात सुद्धा तयार होवोत हीच इच्छा.