पुरुषांसाठी नवीन फॅशन - हे कपडे कोण कोण ट्राय करणार राव ?

पुरुषांसाठी नवीन फॅशन - हे कपडे कोण कोण ट्राय करणार राव ?

कधी कसली फॅशन येईल ते सांगता येत नाय राव. पूर्वी टापटीप जीन्सची फॅशन होती. नंतर फाटलेल्या, चिंध्या झालेल्या जीन्सची फॅशन आली. अशा कपड्यांमुळे समजतच नाही की माणूस गरीब आहे म्हणून तसले कपडे घालत आहे, की श्रीमंत आहेत म्हणून मिरवत आहेत.  पण मंडळी, फाटक्या जीन्सपर्यंत तरी ठीक होतं. पण आज आम्ही तुम्हाला जे दाखवणार आहोत ते तुम्हाला डायरेक्ट कोमात नेऊ शकतं. खास करून पुरुषांना!!!

स्रोत

वर जे फोटोत दिसत आहे ते कोणत्याही मुलीचे कपडे नसून मुलांचेच कपडे आहेत. तुम्हाला कदाचित वाटेल कि हे लोक झोपेत उठून बायकोचे कपडे नेसून फोटो कशाला काढत आहेत ब्वा/?  पण राव,  हे बाप्ये लोक मॉडेल आहेत.

स्रोत

स्रोत

स्रोत

स्पेनच्या ‘पॅलोमो स्पेन’ या कंपनीने हे कपडे खास पुरुषांसाठी तयार केले आहेत. ‘अॅलेजान्ड्रो गोमेझ पॅलोमो’ या डिझायनरने ते डिझाईन केलेत. अॅलेजान्ड्रोच्या म्हणण्याप्रमाणे ‘पुरुषांनी आता नव्या पद्धतीचे कपडे ट्राय केले पाहिजेत’.

काय आहे राव,  या डिझायनरने जुन्या युरोपियन स्टाईलला आजच्या जमान्यात उतरवलं आहे.  पण ते एवढं भयानक झालं आहे की आता बोलायला शब्दच नाहीत !!

हे एवढं सगळं बघितल्यावर मंगळावर निघून जाण्याची इच्छा होत आहे. नाही का ?

पण थांबा!!! तुमचा कोणी मित्र आहे का, ज्याला फॅशनेबल कपड्यांची आवड आहे? मग त्याला टॅग करा की राव... त्याला पण कळूदे तुम्हाला त्याच्या फॅशनची किती काळजी आहे ते !!