एक काळ असा होता जेव्हा राजे महाराजे होते. त्यानंतर हुकुमशाही राजवट आली आणि हुकुमशाही जाऊन लोकशाहीचा जगात प्रसार झाला. राजेशाही किंवा हुकुमशाही पद्धत कमी झाली असली तरी नष्ट झालेली नाही. आज ४९ देशांमध्ये हुकुमशाही किंवा राजेशाही पद्धतीने देशाचा कारभार चालवला जातो. सौदी अरेबिया, इराण, उत्तर कोरिया, कतार, ओमन ही त्यातलीच प्रमुख नावे.
मंडळी, हुकुमशहा हा जसा सत्तेत येण्यासाठी रक्तपात करतो तसचं त्याला सत्तेतून हाकलण्यासाठी सुद्धा रक्तपात केला जातो. जुना हुकुमशहा जाऊन नवीन हुकुमशहा येणे ही हुकुमशाही मध्ये नवीन बाब नाही. एक हुकुमशहा किती काळ राज्य करेल याची खात्री नसते. पण जगात असे काही हुकुमशहा आहेत ज्यांनी त्यांच्या देशावर सर्वात जास्त काळ राज्य केलं. चला तर बघुयात ते हुकुमशहा आहेत तरी कोण.
राजवट संपलेले हुकुमशहा :












