इन्स्टाग्रामवर सध्या एक पोरगी धुमाकूळ घालत आहे भाऊ. ती कोणी मोठी स्टार वगैरे नाही. तरी तिची जबरदस्त हवा झालीय. तिच्या फोटोंनी इन्स्टाग्रामवर अक्षरशः आग लावलीय. आम्ही सांगत काय बसलोय? फोटो बघा तिचा.

तर, ही पोरगी आहे ब्राझीलची ‘लॉना टोरेस’. व्यवसायाने हेलिकॉप्टर पायलट. तिचं वय आहे फक्त २८ वर्ष! एवढ्याशा वयात तिने तब्बल २८ देश पालथे घातले आहेत राव. इकॉनॉमिक्समध्ये पदवी घेतल्यानंतर तिने आपलं क्षेत्र बदललं आणि ती हेलिकॉप्टर पायलट झाली. तिचा भाऊ पायलट असल्याने लहानपणापासून तिच्यावर पायलट होण्याचे संस्कार होत राहिले. तिने पदवी मिळवल्यानंतर आपलं क्षेत्र बदलण्याचा निर्णय घेतला. सध्या ती तिचं स्वप्न जगत आहे.
ती अमेरिका कॅनडा देशांसह २८ देशांमध्ये आपल्या हेलिकॉप्टरमधून फिरली आहे. ती २२ आणि आर४४ सारखे लहान हेलिकॉप्टर उडवते. तिने भेट दिलेल्या ठिकाणांवरून ती तिचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. तिने जेव्हा पासून तिचे फोटो शेअर करण्यास सुरुवात केली आहे, तिला ८३ हजार लोकांनी फॉलो केलं आहे. तिच्या लुक्सला बघून तिचे फॉलोअर्स तिला सगळ्यात ‘हॉट हेलिकॉप्टर पायलट’ म्हणतात.
मंडळी तिचे फॉलोवर्स तिला ‘हॉट पायलट’ का म्हणतात याचे आणखी पुरावे खालील फोटो मध्ये तुम्ही पाहू शकता.
