जगात महिला कोणत्या जागी सुरक्षित आहेत ब्वॉ? असा कुठला देश आहे का? उत्तर आहे का राव? काही पुरुषांच्या गिधाडासारख्या नजरांचा महिलांना अनेकदा अनुभव येत असतो.. मग तो भारत असो वा दुसरा कुठलाही देश..
आता हेच बघा ना, सिंगापूरसारख्या ठिकाणी ‘MRT’ च्या ट्रेननं प्रवास करताना ‘उमा माहेश्वरी’ला असाच काहीसा अनुभव आला. अगदी तुरळक गर्दीच्या ट्रेनमध्ये हा प्रकार घडला.
झालं असं की, उमा माहेश्वरी प्रवासात असताना त्यांच्या समोर एक माणूस येऊन बसला. मोबाईलमधले मेसेज चेक करण्याच्या बहाण्यानं या माणसानं चक्क उमाचं रेकॉर्डिंग करायला सुरुवात केली. याची हिम्मत म्हणजे कॅमेरा झूम करून हा रेकॉर्डिंग करत होता. पण हे महाशय या कामात एवढे बुडून गेले होते की त्यांना समजलंच नाही की आपण जे काही करतोय ते मागं खिडकीच्या काचेत स्पष्ट दिसतंय.

हा सगळा प्रकार उमाच्या लक्षात आल्यानंतर तिनं उलट त्याच माणसाचा व्हिडीओ काढून ट्रेनच्या स्टाफकडे सुपूर्त केला. या माणसाला तिनं ट्रेन मधून उतरल्याक्षणीच गाठलं. आता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. चौकशअंती असं समजलंय की हा ’सूरज’ नावाचा एक भारतीयच आहे.
उमानं हा व्हिडीओ फेसबुक वर टाकला आणि तो बघता बघता व्हायरल झालाय. साहजिक या प्रकाराबद्दल त्याला इ-चपलांचा प्रसाद मिळतोय. तुम्हालाही एखादी चप्पल मारावीशी वाटली तर नक्की मारा, पण कमेंट बॉक्स मध्ये !!!