आपला भारत देश खऱ्या अर्थाने “आम्रभूमी” आहे. भारतात १२०० हून अधिक आंब्याच्या प्रजाती आहेत. या पैकी फक्त २० प्रकारच्या आंब्यांची जोपासना पीक म्हणून केली जाते आणि त्यांचा व्यापार होतो. संपूर्ण जगात आंब्याच्या निर्यातीत भारत अव्वल नंबरवर आहे. आपल्याला सुद्धा आंब्याच्या काही जाती माहित नसतील. आंब्याचा राजा हापूस म्हटला तरी इतर अनेक मानकरी या स्पर्धेत आहेत.
मंडळी गुढीपाडवा येतोय आणि आपल्यातले अनेकजण या दिवसापासून आंबा खायला सुरुवात करतील, पण त्या आधी बघुयात भारतातील प्रत्येक राज्यामध्ये कोणत्या प्रजातीचा आंबा पिकतो ते.













