मंडळी गुजरातच्या सुरतमध्ये २५१ मुली लग्नाच्या ड्रेसमध्ये सजून तयार होत्या. रविवारी या साऱ्यांची लग्न एकाच दिवशी होणार होती. या सगळ्या मुलींमध्ये एक गोष्ट समान होती, ती म्हणजे यांना वडील नव्हते. ते वडील मिळाले ‘महेश सवानी’ यांच्या रुपात.
मंडळी, महेश सवानी हे हिऱ्यांचे प्रसिद्ध व्यापरी आहेत आणि ते दरवर्षी मोठ्या प्रमाणात सामुदायिक लग्न सोहळ्याचं आयोजन करतात. यावर्षी त्यांनी तब्बल २५१ मुलींचं कन्यादान’ केलं आहे. ज्या मुलींना वडील नाहीत आणि त्यांना लग्नाचा खर्च उचलता येत नाही, अशा मुलींच्या लग्नाची सारी व्यवस्था त्यांनी केली.
या २५१ जोडप्यांपैकी ५ जोडपी मुस्लीम समाजातील होती, तर १ ख्रिश्चन समजातील. या जोडप्यांसाठी त्यांच्या धर्माप्रमाणे वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय २ एच.आय.व्ही पॉझिटीव्ह मुलींची देखील लग्न पार पाडण्यात आली.

हेश सवानी(स्रोत)
महेश सवानी फक्त लग्नच करून न देता, या सर्व मुलींना पुढील संसारासाठी सोफा, बेड, इतर काही वस्तू तसेच प्रत्येकी ५ लाखांपर्यंतची रक्कमदेखील देतात. २०१२ पासून त्यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याला सुरुवात केली. या दरम्यान अनेक मुलींचं कन्यादान त्यांनी केलं आहे.
साधारणत: मुलीचे वडील तिच्या लग्नाचा खर्च उचलतात. पण वडीलच नसतील तर? यामुळेच महेश सवानी पुढे आले आणि त्यांनी खुल्या हातांनी मदत करण्याचं ठरवलं. त्यांनी म्हटल्याप्रमाणे गरजू मुलींना त्यांच्या लग्नासाठी मदत करणे ही त्यांची सामाजिक जबाबदारी आहे.
खालील फोटोंमध्ये तुम्ही लग्न सोहळा कसा पार पडला याची झलक पाहू शकता.









सर्व फोटो (स्रोत)
