या म्युझियम मधल्या गोष्टी साधारण डोळ्यांनी दिसत नाहीत...काय आहे कारण ?

या म्युझियम मधल्या गोष्टी साधारण डोळ्यांनी दिसत नाहीत...काय आहे कारण ?

प्रत्येक देशात म्युझियम हा प्रकार तिथला ऐतिहासिक ठेवा जपून ठेवण्याचं काम करत असतो. तसा तो हंगेरी या देशात देखील आहे. हंगेरीतलं ‘Szentendre’ हे शहर चक्क म्युझियमसाठीच ओळखलं जातं. तिथल्या म्युझियम्समधल्या ऐतिहासिक गोष्टी बघण्यासारख्या आहेत. पण जर तुम्हाला यातील सर्वात अप्रतिम म्युझियम पहायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला दुर्बीण लागेल भाऊ. कारण हे म्युझियम साधारण डोळ्यांना दिसत नाही.

स्रोत

या म्युझियमचं नाव आहे ‘मायक्रो वंडर म्युझियम’. हंगेरीची राजधानी बुडापेस्टपासून जवळच हे एक साधारण खोलीवजा जागेत वसलं आहे. या जागेला बघून कदाचित तुम्हाला शंका येईल की इथे नेमकं काय बघायचं? तुम्ही तिथल्या ओळीने असलेल्या दुर्बिणीतून आत डोकावलं तर तुम्हाला तिथली खरी जादू दिसेल. एका सेफ्टी पिनच्या आत असलेलं पिरामीड, उंट, तसच पवनचक्की, चेस बोर्ड, पक्षांचं घरटं, अर्धा मिलीमीटर आकारातलं पुस्तक, कीटक, अब्राहम लिंकन यांचं चित्र असं अगदी लहान जग तुम्हाला दिसेल. आश्चर्य म्हणजे आकाराने शंभरपट मोठ्या गोष्टींना एवढं लहान रूप देताना त्यातल्या बारकाव्यांना तंतोतंत उतरवलं गेलं आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल या लै भारी कामामागे कोणत्या माणसाचे जादुई हात आहेत ?

स्रोत

हा कलाकार आहे उक्रेनचा ‘मायकोला सायड्रीस्टी’. या कलाकाराने ज्या इलेक्ट्रोमीटरच्या सहाय्याने या कलाकृती तयार केल्या आहेत, त्याचाच आकार एखाद्या खसखसच्या बी एवढा आहे. या अगदी लहान यंत्राच्या सहाय्याने त्याने हे म्युझियम साकारलं आहे. या कामात त्याला त्याच्या श्वासांवर प्रचंड नियंत्रण ठेवावं लागलं होतं. त्याच्या एकाग्रतेतून आणि जिद्दीतून एक अप्रतिम कलाकृती तयार झाली आहे. त्याच्या या कामातील हातखंडा बघता त्याला ‘सूक्ष्म कलाकृतींचा बादशहा’ म्हटलं जातं.

मंडळी हंगेरीमध्ये जाऊन प्रत्येकाला ही कला बघणं शक्य नाही त्यामुळे आम्ही इथेच तुमच्यासाठी या म्युझियमची झलक घेऊन आलो आहोत. एकदा नजर टाकाच...

स्रोत

स्रोत

स्रोत

स्रोत

स्रोत