प्राण्यांमध्ये जीव लावण्याजोग्या अनेक गोष्ट असतात. बरेच प्राणी देखणे, दिमाखदार दिसतातच पण त्याचसोबत ते उदारही असतात. सहसा कुणी त्यांना त्रास दिल्याशिवाय ते पण दुसऱ्याला त्रास देत नाहीत. ही गोष्ट अनेक उदाहरणातुन दिसून येते.
ट्विटरवर आयएफएस अधिकारी सुशांता नंदा यांनी एक व्हिडिओ शेयर केला आहे. या व्हिडिओत एक लहान माकड कोंबडीच्या पिल्लाची पापी घेताना दिसत आहे. हा छोटासा व्हिडीओ अतिशय सुंदर आहे.
Loved this magical interactions of two pure souls pic.twitter.com/FSV6c0Ite2
— Susanta Nanda IFS (@susantananda3) June 27, 2021
एक छोटे माकड केळ्याच्या पानावर बसले आहे. तिथेच ते एक कोंबडीच्या पिल्लाला आपल्याजवळ घेऊन त्याला लडिवाळपणे खेळवत आहे. ते कोंबडीचे पिल्लू पळून जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्याला शांत करण्यासाठी माकड पिल्लाला जवळ घेऊन पापी घेताना दिसत आहे.
या दोन्ही प्राण्यांची एकमेकांबद्दल असलेली ही प्रेमाची आणि आपुलकीची भावना बघून लोकांनाही हा व्हिडीओ अतिशय भावला आहे. अनेक नेटकऱ्यानी यावर विविध प्रतिक्रिया देत त्यांच्या या सुंदर नात्याचे कौतुक केले आहे.
मध्यंतरी असाच एक व्हिडिओ वायरल झाला होता, त्यात एक कुत्र्याचे पिल्लू पाण्यात बुडत असलेल्या हरणाच्या पाडसाला वाचविण्यासाठी पाण्यात धावले होते. यासारखी उदाहरणे बघून प्राण्यांमध्ये खरच मोठी सद्भावना असते, याची प्रचिती येते.
