माकडाने मोबाईल चोरून चक्क ऑनलाईन शॉपिंग केली आहे भाऊ...काय मागवलंय पाहा !!

लिस्टिकल
माकडाने मोबाईल चोरून चक्क ऑनलाईन शॉपिंग केली आहे भाऊ...काय मागवलंय पाहा !!

आज आम्ही एका हुशार माकडाची गोष्ट सांगणार आहोत. या माकडाने चक्क ऑनलाईन शॉपिंग केली आहे. अहो खरंच. 

त्याचं काय झालं, चीनच्या Yancheng Wild Animal World प्राणीसंग्रहालयात काम करणारी Lv Mengmeng तिथल्या माकडासाठी जेवण आणायला गेली होती. तिचा मोबाईल ऑफिसमध्येच राहिला होता. परतल्यानंतर जेव्हा तिने आपला मोबाईल पाहिला तेव्हा तिला ऑनलाईन शॉपिंगचा मेसेज दिसला. ही ऑर्डर तिने दिली नव्हती. अशा गोष्टी मागवण्यात आल्या होत्या ज्या तिने ‘शॉपिंग कार्ट’ मध्ये सेव्हही केल्या नव्हत्या. संशय येऊन तिने सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यावर खरं काय ते समजलं.

प्राणीसंग्रहालयातल्या एका माकडाचं हे काम होतं. अनेक वर्षांपासून प्राणीसंग्रहालयात काम करत असल्यामुळे माकडाची आणि तिची चांगलीच ओळख झाली आहे. Lv Mengmeng जागेवर नाही बघून माकडाने मोबाईल घेऊन या भानगडी केल्या.

एक आश्चर्याची गोष्ट अशी की माकडाने किरण मालाच्या गोष्टी मागवल्या आहेत. Lv Mengmeng ने एका मुलाखतीत सांगितलं की ती नेहमी किरण माल ऑनलाईन मागवते. कदाचित तिचीच नक्कल माकडाने केली असावी. माकडाने मागवलेल्या सगळ्या गोष्टी गरजेच्या होत्या त्यामुळे तिने ऑर्डर कॅन्सल केली नाही. 

मंडळी, हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. गेल्या वर्षी एका पोपटाने चक्क अॅलेक्साचा वापर करून अमेझॉनवर खरेदी केली होती.