काय, शीर्षक वाचून आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे! आज तुम्हाला सांगणार आहोत एक मजेशीर परंतु तितकीच महत्वपूर्ण कायदेशीर घटना. एका डासामुळे इन्श्युरन्स कंपनीला ग्राहकासमोर कसे झुकावे लागले याची कहाणी… वाचा तर मग !
ही केस लढली गेली नॅशनल इन्श्युरन्स कंपनी विरुद्ध मौसुमी भट्टाचारजी यांच्यामध्ये. झालं असं की, कोलकातामध्ये राहणाऱ्या मौसुमी भट्टाचारजी यांचे पती देबाशीष भट्टाचारजी यांनी बँक ऑफ बडोदाकडून घर बांधणीसाठी कर्ज घेतले होते. या कर्जासोबत बँकेच्या नियमाप्रमाणे त्यांना एक इन्श्युरन्स पॉलिसी देण्यात आली होती. या पॉलिसीत पॉलिसी धारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास पॉलिसीधारकाच्या नॉमिनीला विम्याची संपूर्ण रक्कम मिळेल असे नमूद केले होते. ही पॉलिसी सुरू असतानाच दुर्दैवाने देबाशीष यांचे 22/01/2012 रोजी निधन झाले. ते मोजांबिक देशात एका चहा कारखान्यात कामाला होते आणि त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला मलेरियाचा डास!




