या २० जानेवारीला अमेरिकेच्या अध्यक्षपदावर डोनाल्ड ट्रम्प विराजमान झाले. त्यामुळं आता अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आपल्या फॅमिली सोबत व्हाईट हाऊस सोडून आपल्या नव्या घरात शिफ्ट झालेत. आपली लहान मुलगी साशा हिचं हायस्कूल ग्रॅज्युएशन पुर्ण होईपर्यंत पुढची दोन वर्षे ते वॉशिंग्टन डी. सी. इथंच राहण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय.






